ज्येष्ठ स्वयंसेवक नाना नवले यांच्या निवासस्थानी भाजपा प्रदेशाध्यक्ष चव्हाणांनी दिली भेट
छत्रपती संभाजीनगर, 27 सप्टेंबर (हिं.स.)। कारकीन (छ. संभाजीनगर ) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक एक व्रतस्थ व्यक्तिमत्व नाना नवले यांच्या निवासस्थानी भारतीय जनत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज भेट दिली. यावेळी नानांची
अ


छत्रपती संभाजीनगर, 27 सप्टेंबर (हिं.स.)।

कारकीन (छ. संभाजीनगर ) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक एक व्रतस्थ व्यक्तिमत्व नाना नवले यांच्या निवासस्थानी भारतीय जनत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज भेट दिली. यावेळी नानांची आस्थेने विचारपूस केली.

नानांनी नेहमीच एकात्मता, त्याग, शिस्त आणि राष्ट्रभक्ती या मूल्यांना प्राधान्य दिले. आजही त्यांच्यासारखे अनेक स्वयंसेवक आपल्या कार्यातून समाजाला योग्य दिशा दाखविण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. त्यांच्या संघनिष्ठ वृत्तीतून प्रेरणा घेणं हे खरं तर प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक आहे. असे चव्हाण यांनी सांगितले

यावेळी मंत्री अतुल सावे, आ.नारायण कुचे, राज्यसभा सदस्य भागवत कराड, प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील हे उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande