शिवूर येथे बौद्ध विहार बांधकामाचे भूमीपूजन
छत्रपती संभाजीनगर, 27 सप्टेंबर (हिं.स.)।मौजे शिवूर येथे बौद्ध विहार बांधकामासाठी मंजूर झालेल्या १ कोटी रुपयांच्या निधीतील कामांचा भूमिपूजन व शुभारंभ सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. वैजापुर-गंगापुर मतदारसंघातील शिवूर गावाला बौद्ध विहाराचे हे भव्य
अ


छत्रपती संभाजीनगर, 27 सप्टेंबर (हिं.स.)।मौजे शिवूर येथे बौद्ध विहार बांधकामासाठी मंजूर झालेल्या १ कोटी रुपयांच्या निधीतील कामांचा भूमिपूजन व शुभारंभ सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

वैजापुर-गंगापुर मतदारसंघातील शिवूर गावाला बौद्ध विहाराचे हे भव्य बांधकाम व्हावे यासाठी “१ कोटी रुपयांचा निधी” मंजूर करून आणला.

या कामांचा भूमिपूजनाचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.संजय शिरसाट यांच्या हस्ते आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरणारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या मंगलप्रसंगी पूज्य भंते बोधीधम्मा थेरो, पूज्य भंते पत्रवंत व पूज्य भंते पत्रजीत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिवूरच्या सर्व ग्रामस्थांसाठी विकासाचा हा सोहळा, गावाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल असा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण ठरला.यावेळी पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, सदस्य, संचालक, सर्व प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande