मराठवाड्यातील भाजप आमदार मंत्री नेत्यांची पदवीधर मतदार संघासाठी एकजूट
छत्रपती संभाजीनगर, 27 सप्टेंबर (हिं.स.)।आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश मराठवाडा विभाग पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी अभियानाची नियोजित बैठक, प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मंथन सभागृह, एमआयटी कॉलेज, सातारा परिसर, छत
अ


छत्रपती संभाजीनगर, 27 सप्टेंबर (हिं.स.)।आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश मराठवाडा विभाग पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी अभियानाची नियोजित बैठक, प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मंथन सभागृह, एमआयटी कॉलेज, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाली.

या बैठकीत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या संघटनात्मक बांधणी, निवडणूक नियोजन आणि जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणीच्या रणनीतीवर सखोल चर्चा झाली. त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत, भारतीय जनता पक्षाच्या ‘’ विचारधारेला बळकटी देण्याचा संकल्प व्यक्त केला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील शिक्षक, कर्मचारी, उद्योजक आणि तरुण पदवीधरांना जोडून त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे.

या प्रसंगी अतुल सावे (इतर मागास व बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री), खासदार डॉ. भागवत कराड (माजी केंद्रीय मंत्री), डॉ. अजित गोपछडे (राज्यसभा खासदार), श्रीमती मेघनाताई बोर्डीकर (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री), मा. संजय कौडगे (संघटन मंत्री), आ. विक्रांत पाटील (प्रदेश सरचिटणीस), . आ. संभाजी निलंगेकर (माजी मंत्री), राहुल लोणीकर (सचिव सह नोंदणी प्रमुख), गुरुनाथ मगे (सह नोंदणी प्रमुख), आ. तान्हाजी मुटकुळे, आ. नारायण कुचे, . आ. प्रशांत बंब, अमर राजूरकर (माजी आमदार), किरण पाटील (प्रदेश सचिव), श्रीमती शालिनी बुंधे (प्रदेश सचिव), श्रीकांत जोशी, इद्रिस मुलतानी, श्रीमती अनुराधा चव्हाण, तसेच जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, मंडळ अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी आणि नोंदणी संयोजक उपस्थित होते.

पंतप्रधान . नरेंद्र मोदी, गृहमंत्री मा. अमित शाह आणि . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या तत्त्वाला अनुसरून मराठवाड्यातील प्रत्येक पदवीधराचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शिक्षण, रोजगार आणि उद्योगवृद्धीच्या क्षेत्रात ठोस पावले उचलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या बैठकीने मराठवाड्यात पक्षाच्या कार्याला नवीन गती आणि दिशा दिली आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande