अमरावतीत ५४ खातेधारकांची ३३.६१ लाखाने फसवणूक
सहयोग मल्टीस्टेट सोसायटीमधील खळबळजनक प्रकार अमरावती, 27 सप्टेंबर (हिं.स.)। राजापेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सहयोग मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी बेनीफेट शाखा तारामंदीर रोड येथे ३३ लाख ६१ हजार १९५ रुपयांनी ५४ खातेधारकांची फसवणूक करण्यात आल्य
अमरावतीत ५४ खातेधारकांची ३३.६१ लाखाने फसवणूक


सहयोग मल्टीस्टेट सोसायटीमधील खळबळजनक प्रकार अमरावती, 27 सप्टेंबर (हिं.स.)। राजापेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सहयोग मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी बेनीफेट शाखा तारामंदीर रोड येथे ३३ लाख ६१ हजार १९५ रुपयांनी ५४ खातेधारकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या शाखेत टीम लीडर म्हणून कामकरणाऱ्या रियाज अहमद शेखबन्नू (४२, सुफियाननगर) यांनी याविषयी राजापेठ पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी शिवाजी किसनराव जाधव (पुणे), प्रमोद भुजंगराव डकडे (वृंदावन कॉलनी, अमरावती) यांनी खातेधारकांची रक्कम घेऊन त्यांना परतावा दिला नाही. टीम लिडर असल्यामुळे ५४ खातेधारकांनी त्यांच्या माध्यमातून सुमारे ३३ लाख ६१ हजार १९५ रुपयांची गुंतवणूक केली. २०१६ पासून ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत ही रक्कम गुंतवण्यात आली. राजापेठ पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande