सोलापूर, 27 सप्टेंबर (हिं.स.)। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे 88 गावांत पाणी शिरले. त्यामुळे जनावरांचा चारा, घरातील पशुखाद्य, कडबा, मुरघास वाहून गेल्याने मोफत चारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रतिदिन 100 मेट्रिक टन चारा लागणार असून, आत्तापर्यंत 1 हजार मेट्रिक टन चार्याची उपलब्धता झाली आहे.चारा वाटप करण्यास सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
जनावरांच्या चार्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. दरम्यान, सांगोला येथून 30 मेट्रिक टन चारा शासकीय डेपोतून ट्रकमधून पुरबाधित गावांकडे रवाना झाला. सांगली येथून चारा आणण्यासाठी वाहने गेली आहेत. इतर तीन जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांशी चार्याबाबत बोलणे झाले असून, खासगी व्यक्तींनी दिलेल्या चार्यासाठी स्थळे निश्चित केली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड