चंद्रपूर : ताडोबाच्या पर्यंटन शुल्कात तीन महिन्यांपूर्वीच वाढ झाली
चंद्रपूर, 27 सप्टेंबर (हिं.स.)। ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे शुल्कात मोठ्या प्रमाणात सध्या कोणतेही वाढ झालेली नसल्याचे ताडोबा व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. पर्यटन शुल्कात तीन महिन्यांपूर्वी १ हजार रुपयांची वाढ झालेली होती. ताडोबा-अंधारी व्याघ्र
चंद्रपूर : ताडोबाच्या पर्यंटन शुल्कात तीन महिन्यांपूर्वीच वाढ झाली


चंद्रपूर, 27 सप्टेंबर (हिं.स.)। ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे शुल्कात मोठ्या प्रमाणात सध्या कोणतेही वाढ झालेली नसल्याचे ताडोबा व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. पर्यटन शुल्कात तीन महिन्यांपूर्वी १ हजार रुपयांची वाढ झालेली होती. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे शुल्कात मोठ्या प्रमाणात सध्या कोणतेही वाढ झालेली नाही. पर्यटन शुल्कात तीन महिन्यांपूर्वी फक्त रु.१ हजार रुपयांची वाढ झालेली होती. या दराप्रमाणे मागील तीन महिन्यापासुन कोअर व बफर साठी ऑनलाईन बुकींग सुरु आहे. तसेच मागील तीन महिन्यापासुन बफरची सफारी ही नविन दरानुसार सुरु आहे. त्यानंतर शुल्कात कोणतेही वाढ झालेली नाही. सदर वाढ ही याबाबत संपुर्ण प्रक्रिया राबवुन करण्यात आलेली होती. सदर वाढलेल्या १ हजार शुल्कामध्ये स्थानिक गावकऱ्यांचे जिप्सी शुल्क ३०० व गाईड शुल्क रु. १०० रुपयांचा समावेश आहे. तसेच याआधी कॅमेरा शुल्क गेटवर घेण्यात येत असल्याने पर्यटन गेटवर जिप्सीची मोठी रांग लागत होती व पर्यटकांना असुविधा होत होती. करीता कॅमेरा शुल्काचाही समावेश वाढलेल्या टिकीटामध्ये करण्यात आलेला होता. बरिलप्रमाणे नमुद शुल्कानुसार पुढील तीन महिन्याचे जवळपास ९० टक्के उपलब्ध ऑनलाईन सफारीचे बुकींग पर्यटकांकडून करण्यात आलेले आहे. तसेच याआधी चंद्रपूर जिल्ह्याचे स्थानिक रहिवाश्यांना प्रती व्यक्ती रु. ७२० आणि वेगळ्याने कॅमेरा शुल्क लागत होते. त्यामध्ये कोणतेही वाढ झालेले नसुन कॅमेरा शुल्कात १०० टक्के सुट देण्यात आलेली आहे. या सवलतीच्या दराने आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील अंदाजे ४० हजार लोकांनी जंगल सफारी केलेली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande