लातूर, 27 सप्टेंबर, (हिं.स.) - काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आणि नेते धीरज विलासराव देशमुख यांनी आज रेणापूर तालुक्यातील अरजखेडा, दर्जीबोरगाव व ब्रम्हवाडी या गावांमध्ये जावून तेथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सहका-यां समवेत पाहणी केली.
सततच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला असून सरकारने आता पंचनामे, निकष अशा बाबींची कारणे पुढे न आणता सरसकट आर्थिक मदत करायला हवी. असं करण्यासाठी सरकारला आम्ही भाग पाडू. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि तोच आज अडचणीत सापडला आहे त्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, असे त्यांनी सांगितले. संकटाच्या या काळात आम्ही शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा विश्वास यावेळी शेतकरी बांधवाना दिला.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis