धुळे जिल्ह्यात डिफेन्स कॉरिडॉरसाठी हालचालींना वेग
धुळे , 27 सप्टेंबर, (हिं.स.)उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी मोठा टप्पा गाठण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यात डिफेन्स कॉरिडॉर मंजूर व्हावा, यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणव
धुळे जिल्ह्यात डिफेन्स कॉरिडॉरसाठी हालचालींना वेग


धुळे , 27 सप्टेंबर, (हिं.स.)उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी मोठा टप्पा गाठण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यात डिफेन्स कॉरिडॉर मंजूर व्हावा, यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे औपचारिक मागणी केली. राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने या मागणीला महत्त्व देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे डीएमआयसी प्रकल्प मजूर असून त्याठिकाणी उद्योग उभारण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत तसेच विखरण येथे एमआयडीसी उभारण्यासाठी मागील काही वषारपासून पाठपुरावा सुरू आहे. डिफेन्स कॉरिडॉर मंजूर झाल्यास या ठिकाणी शेकडो कोटींची गुंतवणूक होईल, मोठ्या उद्योगधंद्यांना चालना मिळेल तसेच स्थानिक तरुणांसाठी हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

पालकमंत्री रावल यांनी सांगितले की, धुळे जिल्ह्यात डिफेन्स हब व्हावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे मागणी केल्याबद्दल आभार, धुळे जिल्हात भौगोलिकदृष्ट२या अनुकूल स्थान, उत्तम संपर्क साधने, मोठा भूभाग आणि कौशल्यपूर्ण मानवी संसाधन उपलब्ध आहे. त्यामुळे डिफेन्स कॉरिडॉर येथे झाल्यास केवळ जिल्हाच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा औद्योगिक चेहरा बदलू शकतो. औद्योगिक क्षेत्रात धुळे जिल्ह्याची ओळख निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प निर्णायक ठरेल.

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande