लातूर: संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दिक्षांत समारंभ
लातूर, 27 सप्टेंबर (हिं.स.)संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हरंगुळ बु. लातूर येथे दिक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचलित ही संस्था दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्रातील एकमेव स्वतंत्र औद्योगिक प्रशिक
अ


लातूर, 27 सप्टेंबर (हिं.स.)संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हरंगुळ बु. लातूर येथे दिक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचलित ही संस्था दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्रातील एकमेव स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण केंद्र असून, त्यांच्या कौशल्य विकास आणि सशक्तीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहे.

समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा उदय, हाच खरा अंत्योदय असून प्रत्येक गरजूचा उद्धार केला तरच देशाचा खऱ्या अर्थाने विकास होईल पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या याच विचारांचे अनुसरण करून संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे. 365 दिवस समाजासाठी सेवा प्रदान करण्याचे काम संवेदना दिव्यांग प्रशिक्षण संस्था करत आहे. समाजामध्ये संवेदना संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी केले जाणारे कार्य हे खरोखरच प्रेरणादायी आणि ऊर्जादायी आहे. या संस्थेने समाजातील दिव्यांग व्यक्तींसाठी केलेले कार्य अवर्णनीय आहे.

यावेळी भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील , शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील, जिल्हा संघचालक रामेश्वर बेंबडे , सेवा पंधरवडाचे लातूर जिल्ह्याचे संयोजक रोहिदास वाघमारे , माजी सभापती समाजकल्याण जि.प. लातूर श्री. रोहिदास वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande