छत्रपती संभाजीनगर, 27 सप्टेंबर (हिं.स.)। शासकीय कर्करोग रुग्णालय (कॅन्सर हॉस्पिटल) छत्रपती संभाजीनगरचा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला.
या निमित्ताने रुग्णालयास भेट देत अधिष्ठता डॉ.शिवाजी सुक्रे यांच्याशी आमदार प्रदीप जयस्वाल यांनी संवाद साधला
यावेळी रुग्णालयाच्या सेवाकार्यातील योगदानाचे कौतुक केले. “गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांना या रुग्णालयातून मिळणारी उपचार सेवा व आशा ही खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरते. अशा सेवाभावी कार्यामुळे अनेकांना नवसंजीवनी लाभते,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारीवृंद उपस्थित होते. रुग्णालयाच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत समाजातील सर्व घटकांनी या सेवाभावी उपक्रमात सहभाग घेण्याचे आवाहनही केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis