लातूर : पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे - पालकमंत्री
लातूर, 27 सप्टेंबर (हिं.स.) : मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे लातूर जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूर परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने द
अ


लातूर, 27 सप्टेंबर (हिं.स.) : मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे

लातूर जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूर परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. सुरू असलेल्या सततच्या पावसाने धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.नागरिकांनी कोणतेही धोकादायक प्रवास किंवा शेतीची कामे टाळावीत. आपल्या कुटुंबाची आणि गाव-शहराया सुरक्षेसाठी करण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. जिल्हा प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या माध्यमातून तातडीची मदत पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जळकोट तालुक्यातील बेलसांगवी येथे पाण्याचा वेढा पडलेल्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अहमदपूर येथील चिलखा बॅरेजवर अडकलेल्या मजुरांची स्थानिक बचाव पथक आणि पोलिसांनी यशस्वीपणे सुटका केली आहे, असे पालकमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी घाबरून न जावू नये. पाऊस कमी झाल्यानंतर शेती, जमीन, घर आणि जनावरांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने केले जातील. राज्य शासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल, अशी पालकमंत्र्यांनी दिली. एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande