परभणी जिल्ह्यातील 19 मंडळात अतिवृष्टी; अनेक रस्ते वाहतुकीस बंद
परभणी, 27 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील एकोणीस महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. संपूर्ण जिल्ह्यात पाऊस सक्रिय आहे.विशेषतः पालम व गंगाखेड या दोन तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने अनेक नदी,नाल्यांना, ओढ
परभणी जिल्ह्यातील 19 मंडळात अतिवृष्टी; अनेक रस्ते वाहतुकीस बंद


परभणी, 27 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील एकोणीस महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

संपूर्ण जिल्ह्यात पाऊस सक्रिय आहे.विशेषतः पालम व गंगाखेड या दोन तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने अनेक नदी,नाल्यांना, ओढ्यांना, पूर आले आहेत. पुराच्या पाण्याने नदीवरील पूल पाण्याखाली आहेत. अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक ठप्प आहे. दरम्यान

दिनांक 27 सप्टेंबर 2025 च्या अहवालानुसार तालुका निहाय अतिवृष्टी नोंद -

परभणी तालुका

दैठणा 79.00

पिंगळी 65.8

परभणी ग्रामीण 65.8,

गंगाखेड तालुका गंगाखेड 106.3

महादपुरी 91.5

माखणी 82.3 राणीसावरगाव 143 पिंपळदरी 111.3,

पूर्णा तालुका

पूर्णा 75

ताडकळस 97.8

लिमला 77

कातनेश्वर 67.5

चुडावा 85.8

कावलगाव 99.8, व

पालम तालुका

पालम 153.3

चाटोरी 143

बनवस 139.8

पेट शिवनी 111.5

रावराजुर 113.0

सोनपेठ तालुका आवलगाव 65.8

वडगाव 76.8 या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande