रत्नागिरी : मराठवाड्यातील आपत्तीग्रस्तांना हेल्पिंग हॅंड मदत करणार
रत्नागिरी, 27 सप्टेंबर, (हिं. स.) : मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तसेच वारंवार होणारा ढगफुटीमुळे अनेक गावे पाण्याखाली बुडाली आहेत. तेथील आपत्तीग्रस्तांना मदत करणार असल्याचे रत्नागिरीतील हेल्पिंग हँडतर
हेल्पिंग हँडची बैठक


रत्नागिरी, 27 सप्टेंबर, (हिं. स.) : मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तसेच वारंवार होणारा ढगफुटीमुळे अनेक गावे पाण्याखाली बुडाली आहेत. तेथील आपत्तीग्रस्तांना मदत करणार असल्याचे रत्नागिरीतील हेल्पिंग हँडतर्फे घोषित करण्यात आले आहे.

सोलापूर आणि लातूर येथील जनतेचे अनन्वित हाल सुरू आहेत. त्यामुळे पुन्हा रत्नागिरीकर एकवटले आहेत यापैकी काही गावांना मदत करण्यासाठी निधी संकलनासाठी शनिवारी येथील जयेश मंगल कार्यालयात हेल्पिंग हँड्सच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये मदतीचा निर्णय घेण्यात आला.

आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी रत्नागिरीतील हेल्पिंग हँडसमधील सर्व सामाजिक संघटना आणि संस्थेचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. बैठकीत विविध सामाजिक संघटना विविध व्यावसायिकांच्या संघटना संस्थांना आर्थिक मदतीसाठी आवाहन करण्याचे ठरविण्यात आले. तसेच हेल्पिंग हँडसमधील अनेक कार्यकर्त्यांनी बैठकीतच वैयक्तिक आर्थिक मदत जाहीर केली. सुमारे दोन लाखाचा निधी यावेळी संकलित झाला. आपत्तीग्रस्त गावांना मदत करण्यासाठी रत्नागिरीकरांनी पुन्हा सहकार्यासाठी पुढे यावे, यासाठी हेल्पिंग हँडने मदतीची मोहीम सुरू केली आहे. हेल्पिंग हँड्सच्या माध्यमातून सर्व रत्नागिरीकरांना धान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकरिता उभारण्यात येणाऱ्या आर्थिक स्वरूपात मदत करण्यासाठी स्वेच्छेने यथाशक्ती मदत करून या मदतकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

बैठकीला शकील गवाणकर, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकूरदेसाई, निवृत्त पोलिस अधिकारी शिरीष सासने, राजेश कांबळे, महेश बोराडे, सचिन शिंदे, नीलेश मलुष्टे, चेतन नवरंगे, नंदू चव्हाण, राजू भाटलेकर, वल्लभ वणजू, जयंतीलाल जैन, मरीना डिसोजा, जया डावर, शोभना कांबळे, भूषण बर्वे, अमित काटे, महेश गर्दे, गजानन करमरकर आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande