लातूर, 27 सप्टेंबर (हिं.स.)। चाकूर तालुक्यातील हाळी खुर्द (खुर्दळी) येथील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या श्री. जनमाता आई मंदिरात नवरात्री उत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन सिद्धलिंग महाराज मठ लखनगाव चे मठाधिपती आबा महाराज गिरी यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रचिता संजयकुमार भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बालाजी भोसले, पोलीस पाटील साहेबराव पाटील, जय जवान जय किसान साखर कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय भोसले, चेअरमन जलील पटेल, बाबू दिवाणजी, माजी उपसरपंच बब्रुवान भोसले, संजयकुमार भोसले, धोंडीराम हैदराबादे, मनोहर सूर्यवंशी उपस्थित होते.
या शिबिरात महेश चेऊलवार, तुकाराम जाधव, सोमेश्वर सोनटक्के, जाकीर हुसेन शेख, ओमकार गुनगुने, एकनाथ कांबळे, शरद पाटील, यांच्यासह भावी भक्तांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. या शिबिरात विक्रमी रक्तदाते संगमेश्वर जनगावे यांनी ८२ वे रक्तदान केले.
यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शरद पाटील, सचिव ज्ञानोबा जाधव, उपाध्यक्ष विजयकुमार भोसले, कोषाध्यक्ष संगमेश्वर जनगावे, विश्वस्त मधुकर नरहरे, आदित्य करडीले, जगदीश भोसले, पांडुरंग शिंदे यांच्यासह भाविक भक्त, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis