खडकवासला धरणातील विसर्ग १० हजार क्युसेकपर्यंत वाढणार
पुणे, 27 सप्टेंबर, (हिं.स.)। खडकवासला धरणातील पाण्याची आवक वाढत असल्याने शनिवारी हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढून १० हजार क्युसेकपर्यंत पोहोचण्याची शक्यता मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाने वर्तवली आहे. आज शनिवारी सकाळी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गा
Dam


पुणे, 27 सप्टेंबर, (हिं.स.)। खडकवासला धरणातील पाण्याची आवक वाढत असल्याने शनिवारी हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढून १० हजार क्युसेकपर्यंत पोहोचण्याची शक्यता मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाने वर्तवली आहे.

आज शनिवारी सकाळी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली. सकाळी १० वाजता धरणातून सुरू असलेला २१०५ क्युसेक विसर्ग वाढवून ३७८९ क्युसेक करण्यात आला. सध्या पानशेत आणि वरसगाव धरणांतून प्रत्येकी ४५० क्युसेक पाणी सोडले जात आहे. खडकवासला धरणातील पाण्याची आवक वाढत असल्याने हा विसर्ग हळूहळू १० हजार क्युसेकपर्यंत वाढू शकतो, अशी माहिती मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाच्या नियंत्रण अधिकारी. श्वेता कुहाडे यांनी दिली.

खडकवासला धरण परिसरात झालेल्या पावसामुळे धरणसाखळी पुन्हा एकदा तुडुंब भरली आहे. शनिवारी (दि. २७ सप्टेंबर) सकाळी ६ वाजेपर्यंत खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे मिळून २९.०६ टीएमसी (९९.६९ टक्के) पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी २८.९६ टीएमसी (९९.३५ टक्के) साठा नोंदवला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande