रत्नागिरी : आगाशे विद्यामंदिरात शारदोत्सवानिमित्त कीर्तनसेवा
रत्नागिरी, 27 सप्टेंबर, (हिं. स.) : कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात शारदोत्सवानिमित्त हभप प्रवीण मुळ्ये यांनी कीर्तनसेवा सादर केली. देवी शारदेचे पूजन करून त्यांनी शारदादेवीचे माहात्म्य सांगितले. त्यांच्या कीर्तनाला बालदोस्तांनीही टाळ्या वाजवून व गजर करू
आगाशे विद्यामंदिरात शारदोत्सवानिमित्त कीर्तनसेवा


रत्नागिरी, 27 सप्टेंबर, (हिं. स.) : कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात शारदोत्सवानिमित्त हभप प्रवीण मुळ्ये यांनी कीर्तनसेवा सादर केली. देवी शारदेचे पूजन करून त्यांनी शारदादेवीचे माहात्म्य सांगितले. त्यांच्या कीर्तनाला बालदोस्तांनीही टाळ्या वाजवून व गजर करून साथ दिली.

शाळेत शारदामातेची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. तिची पूजा प्रवीण मुळ्ये यांच्यासमवेत शाळेचे प्रबंधक विनायक हातखंबकर, सदस्य दादा कदम, तसेच मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम, सर्व शिक्षक, शिक्षक-पालक संघाचे प्रतिनिधी यांनीही केली. त्यानंतर मुख्याध्यापिका कदम यांनी शारदोत्सवातील विविध कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली.

शारदोत्सवानिमित्त सभागृहात सजावट, रंगावली यांनी सुशोभन करण्यात आले आहे. शारदामातेचे माहात्म्य मुळ्ये बुवांनी अतिशय सुरेख पद्धतीने मुलांना समजावून सांगितले. मोबाइलचा वापर कमी करा, अभ्यास, व्यायाम करावा, मोठ्यांचा आदर करावा वगैरे अनेक गोष्टी त्यांनी कीर्तनातून संवादन साधत सांगितल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande