लातूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीची भाजप नेत्यांकडून पाहणी
लातूर, 27 सप्टेंबर (हिं.स.)अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर लातूर शहर मतदार संघातील गंगापूर शिवारातभारतीय जनता पक्षाच्या लातूर जिल्ह्यातील नेत्या प्रेरणा होणराव यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
अ

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याखाली गेली आहेत, तर पुराचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या कठीण काळात प्रत्येक नुकसानग्रस्त नागरिकाच्या भावना मी समजू शकते. या दौऱ्यादरम्यान शेतकरी बांधव आणि स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यांना धीर दिला आणि खचून न जाण्याचे आवाहन केले. नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत म्हणून राज्य सरकारने जाहीर केलेल्या २ हजार ३०० कोटी रुपयांच्या पॅकेजचा पहिला हप्ता वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाला पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून मदत थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे राज्य सरकारने निर्देश दिले आहेत.

शेतकरी बंधूंनो, तुम्ही एकटे नाहीत. धीर सोडू नका; या संकटातून तुम्हाला बाहेर काढणे हेच राज्य सरकारचे एकमेव ध्येय आहे.या नुकसान पाहणी दौऱ्यावेळी चेअरमन सतीश धोत्रे, बळीराम गाडेकर, प्रताप शिंदे, दिगंबर मिंड, शेख सिकंदर, मंगेश खंदाडे, किशन तळेकर, इसूब पठाण, अमोल गाडेकर यावेळी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

 rajesh pande