लातूर, 27 सप्टेंबर, ( हिं.स.)।हवामान विभागाने केलेल्या अंदाजानुसार काल रात्रीपासून सर्वत्र पावसाचा जोर खूप वाढला आहे. यामुळे सर्व नद्या, नाले आणि ओढ्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रेणा आणि मांजरा मध्यम प्रकल्पासह सर्व तलाव पूर्ण भरले असल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली
शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे: तुम्ही सर्वांनी अत्यंत सतर्क राहावे आणि स्वतःला सुरक्षित ठेवावे. कृपया कोणीही नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने कमी उंचीच्या पुलावर किंवा नदीपात्रात जाण्याचा धोका पत्करू नका. आपल्या मालमत्तेची, जनावरांची व पशुधनाची विशेष काळजी घ्या. पाऊस सुरु असतांना विजेच्या तारा, जुन्या इमारती आणि घरे कोसळण्याची शक्यता असते, तेव्हा अशा धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याची खबरदारी घ्या. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
संपूर्ण प्रशासन या सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. काही अडचण आल्यास अथवा मदतीची गरज निर्माण झाल्यास प्रशासनाशी किंवा संपर्क साधा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis