लातूर, 27 सप्टेंबर (हिं.स.)।
लातूर जिल्ह्यामध्ये सरासरी 75.3 मिमी पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत (162.9 मिमी सरासरी) प्रत्यक्षात 336.0 मिमी पाऊस झाला आहे. दि. 1 जूनपासून आतापर्यंतचा पाऊस अपेक्षित पर्जन्यमानाच्या (687.9 मिमी) तुलनेत 894.5 मिमी म्हणजेच 130.0% इतका पाऊस झालेला आहे.
लातूर जिल्ह्याची वार्षिक सरासरी (जून ते सप्टेंबर) 706.00 मिमी च्या तुलनेत आजतागायत 894.5 मिमी म्हणजेच 126.7% इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
्जिवीत हानी
मौजे चवण हिप्परगा ता. देवणी येथे घरावरती जुना बुरुज ढासळला आहे. कोणतीही जीवित हानी नाही. एक व्यक्ती किरकोळ जखमी आहे त्यांना दवाखान्यात पाठवले आहे.
मौजे वाघोली ता. औसा येथील बालाजी पल्हाद कात्रे यांची म्हैस काल रात्री झालेल्या पावसाने वीज पडून मयत झाली आहे
गणेश रावसाहेब पाटील राहणार चोबळी यांचा बैल शेतातून उपचारासाठी गावात आणत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत चाकूर नगरपंचायतीच्यावतीने चाकूर शहरातील ज्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे, अशा नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करून त्यांच्यासाठी राहण्याची व जेवणाची योग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे. सुरक्षित स्थलांतरण: 20 कुटुंबे (चाकूर शहरात)
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis