परभणी : हनुमान मंदिरावर कोसळली विज, शिखर व मूर्तींचे नुकसान
परभणी, 27 सप्टेंबर (हिं.स.)। गंगाखेड तालुक्यातील जवळा रूमणा येथे वादळी पावसासह आलेल्या विजेने हनुमान मंदिराच्या शिखरावर प्रहार केला. या घटनेत मंदिराच्या कळसासह शिखरावरील आठ मूर्तींचे मोठे नुकसान झाले. मूर्ती जमिनीवर कोसळून भग्नावस्थेत आल्या आहेत. य
जवळा रूमणा येथे हनुमान मंदिरावर कोसळली विज, शिखर व मूर्तींचे नुकसान


परभणी, 27 सप्टेंबर (हिं.स.)।

गंगाखेड तालुक्यातील जवळा रूमणा येथे वादळी पावसासह आलेल्या विजेने हनुमान मंदिराच्या शिखरावर प्रहार केला. या घटनेत मंदिराच्या कळसासह शिखरावरील आठ मूर्तींचे मोठे नुकसान झाले. मूर्ती जमिनीवर कोसळून भग्नावस्थेत आल्या आहेत. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

जवळा रूमणा परिसरातील रस्त्यावर पाणी वाहू लागल्याने या भागातील खळी, फरकंडा आणि आणखी काही गावांचा संपर्क तुटला. नागरिकांना सुरक्षिततेसाठी घराबाहेर न पडण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.

वीज कोसळून मंदिराचे नुकसान झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाणारे हे मंदिर मोठ्या प्रमाणात भग्नावस्थेत आल्याने गावकरी दुःख व्यक्त करत आहेत.

दरम्यान, प्रशासनाने घटनास्थळी पंचनाम्याची तयारी सुरू केली असून, मंदिर दुरुस्तीबाबत पुढील पावले उचलली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande