महावितरण कंपनीच्या विविध योजनांची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत - पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, 27 सप्टेंबर (हिं.स.) जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मंजूर असलेली महावितरण कंपनीची विविध योजनांची प्रलंबित कामे कालबद्ध कार्यक्रम तयार करून तात्काळ पूर्ण करावीत,असे निर्देश, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ग
महावितरण कंपनीच्या विविध योजनांची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत - पालकमंत्री गुलाबराव पाटील


जळगाव, 27 सप्टेंबर (हिं.स.) जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मंजूर असलेली महावितरण कंपनीची विविध योजनांची प्रलंबित कामे कालबद्ध कार्यक्रम तयार करून तात्काळ पूर्ण करावीत,असे निर्देश, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील, जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित महावितरण कंपनी, कृषी विभाग अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला लोकप्रतिनिधी आणि प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मंजूर कामांना महावितरण कडून गती मिळणे आवश्यक असून यासाठी संबंधित तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन कामे तात्काळ पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, अतिवृष्टीत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्यात येणार असून,सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाणार आहे. पीएम किसान योजनेची प्रकरणे निकाली काढून,सौर ऊर्जा प्रकल्प, पीएम-कुसुम व मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, गतीने राबवून शेतकऱ्यांना लाभ द्यावा, नादुरुस्त रोहित्रे व विजेच्या खांबांची दुरुस्ती करून वीजपुरवठा नियमीत करावा, असे निर्देश त्यांनी दिले. स्मार्ट मीटरबाबत जनजागृती करून पारदर्शक बिलिंग व विजेची बचत याबाबत माहिती गावागावांत पोहोचवावी, असेही ते म्हणाले.

ग्रामीण भागात वायरमन गावात वास्तव्यास नसल्याबाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत असून त्याबाबत कठोर भूमिका घेऊन संबंधितांना नोटीस देण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच तारांची चोरी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande