माळशिरसच्या नगरसेविका रेश्मा टेळे यांचे नगरसेवक पद रद्द
सोलापूर, 27 सप्टेंबर, (हिं.स.)। माळशिरस नगरपंचायतीच्या नगरसेविका रेश्मा टेळे यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. त्यांच्या विरोधात नगराध्यक्ष विजय देशमुख यांनी तक्रार दाखल केली होती. या संदर्भातला निकाल नुकताच देण्यात आला आहे. नगरसेविकेचे पद अपात्र ठरविल
माळशिरसच्या नगरसेविका रेश्मा टेळे यांचे नगरसेवक पद रद्द


सोलापूर, 27 सप्टेंबर, (हिं.स.)। माळशिरस नगरपंचायतीच्या नगरसेविका रेश्मा टेळे यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. त्यांच्या विरोधात नगराध्यक्ष विजय देशमुख यांनी तक्रार दाखल केली होती. या संदर्भातला निकाल नुकताच देण्यात आला आहे. नगरसेविकेचे पद अपात्र ठरविले आहे. रेश्मा टेळे प्रभाग 11 मधून निवडून आल्या होत्या. त्यांनी नगर पंचायतबाबत अनेक तक्रारी करून नगर पंचायत प्रशासनावर आरोप केले होते.

याबाबत नगराध्यक्ष विजय देशमुख यांनी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम 1986 चे कलम 3 (1) (अ) तसेच महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता 1987 चे नियम 6 अन्वये तक्रार दाखल केली होती. त्यांच्या या तक्रारी अर्जावर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली व प्र. सह आयुक्त नगर परिषद डॉ. योगेश डोके यांनी नगरसेवक रेश्मा टेळे यांना अपात्र ठरविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande