जळगाव मनपाच्या २० अधिकारी–कर्मचाऱ्यांच्या बदल्या
जळगाव, 27 सप्टेंबर (हिं.स.) महापालिकेच्या विविध विभागांतील कामकाजाला गती मिळावी यासाठी आयुक्तांनी २० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमुळे आस्थापना, आरोग्य, महसूल, विद्युत, मार्केट व अतिक्रमण निर्मूलन विभागांतील क
जळगाव मनपाच्या २० अधिकारी–कर्मचाऱ्यांच्या बदल्या


जळगाव, 27 सप्टेंबर (हिं.स.) महापालिकेच्या विविध विभागांतील कामकाजाला गती मिळावी यासाठी आयुक्तांनी २० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमुळे आस्थापना, आरोग्य, महसूल, विद्युत, मार्केट व अतिक्रमण निर्मूलन विभागांतील कामकाज अधिक प्रभावी होण्याचा प्रयत्न आहे.

प्रमुख बदल्या पुढीलप्रमाणे – आस्थापना अधीक्षक लक्ष्मण सपकाळे यांच्याकडे आरोग्य विभागातील वरिष्ठ लिपिक पदाची जबाबदारी; त्यांच्या जागी अनुभा भट, तर भट यांचा कार्यभार भाऊसाहेब बागुल यांच्याकडे.भोजराज काकडे यांच्याकडे मूळ कारभारासोबत महसूल उपायुक्तांचे स्वीय सहायक म्हणून अतिरिक्त जबाबदारी.कनिष्ठ अभियंता एस. एस. पाटील यांच्याकडे प्रभाग समिती कार्यालय क्रमांक दोनचे प्रभाग अधिकारी तसेच मिळकत व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त पदभार. गौरव सपकाळे यांच्याकडे मार्केट वसुली अधीक्षक या पदासोबत मिळकत व्यवस्थापन, घरकुल वसुली, भाडेपट्टे व व्यवसाय परवाना विभागांची धुरा. संजय ठाकुर यांच्याकडे आस्थापना अधीक्षक पदासह जाहिरात परवाना व नियंत्रण विभाग.चेतन ठाकरे यांच्याकडे जाहिरात परवाना व नियंत्रण विभाग.राहुल सुशील यांना जन्म–मृत्यू नोंदणी विभागाचा पूर्णवेळ पदभार; महिला व बालकल्याण विभागाचा पदभार काढून घेतला.मंगेश पाटील यांची प्रभाग समिती क्रमांक एक मधून आस्थापना विभागात बदली. याशिवाय अन्य काही कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या अदलाबदल करण्यात आल्या आहेत. बदल्यांमुळे मनपाच्या प्रशासकीय गतीत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande