छत्रपती संभाजीनगर, 27 सप्टेंबर (हिं.स.)छत्रपती संभाजीनगर सह धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्यात पावसाचे धुमशान सुरू झाले आहे. शुक्रवारच्या रात्री नंतर शनिवारी पहाटे पासून धाराशिव नांदेड लातूर बीड आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे.
मराठवाड्यातील जिल्हा प्रशासन संपूर्णपणे सतर्क असून धाराशिव लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मराठवाड्यात नांदेड लातूर आणि धाराशिव हे रेड अलर्ट वर असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे दरम्यान शनिवारी पहाटेपासून सुरू असलेल्या या पावसाने जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाली असून अनेक मार्ग बंद झाले आहेत आणि गावांचा संपर्क देखील सुटला असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषतः धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर पाहायला मिळाला आहे. लातूर जिल्ह्यातील पाऊस झाला आहे. बीड जिल्ह्याला देखीलपावसाने झोडपून काढले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis