छत्रपती संभाजीनगर, 27 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीची सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षांची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात पार पडली.
सर्व संचालक मंडळाने मार्केट कमिटी मध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत नियोजनबद्ध व प्रामाणिकपणे काम केले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळावा, आधुनिक शेती तंत्रज्ञानाची उपलब्धता व्हावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात सातत्याने सुधारणा घडावी या दृष्टीने समितीची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. यांमुळे बाजार समितीचे वार्षीक उत्पन्न ७ कोटी पेक्षा जास्त झाले आहे. काटकसर, पारदर्शकता आणि शेतकरीहिताचे धोरण यांमुळे समितीने उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
या सर्वसाधारण सभेत सर्वात जास्त माल विक्रीस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच सर्वाधिक माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. यामुळे शेतकरी–व्यापारी संबंध अधिक दृढ होऊन परस्पर सहकार्याची नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.
हरिभाऊ बागडे नाना उपबाजारपेठ करमाड उभारली असून मुख्य बाजार आवरात शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मोफत वसतिगृह, पद्मश्री सखाराम पाटील उपबाजारपेठ पिंप्रिराज व लाडसावंगी उपबाजारपेठ उभारणीचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. आम्ही सर्व संचालक मंडळाने केलेली ही सातत्यपूर्ण वाटचाल नक्कीच भविष्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी दिशादर्शक ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis