लातूर - बाबासाहेब पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
लातूर, 27 सप्टेंबर, (हिं.स.) - राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज अहमदपूर तालुक्यातील नागझरी आणि खंडाळी येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत, त्यांचे स्वतंत्र पंचनामे करून अ
Q


लातूर, 27 सप्टेंबर, (हिं.स.) - राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज अहमदपूर तालुक्यातील नागझरी आणि खंडाळी येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत, त्यांचे स्वतंत्र पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता गोविंद भोसले, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता एस.एस. पाटील, शिवानंद हेंगणे, शिवाजीराव देशमुख यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande