नांदेड- जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा पूरग्रस्त भागाचा दौरा
नांदेड, 27 सप्टेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण‌ मंत्री संजय राठोड यांनी नांदेड जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागांचा दौरा केला. शेवडी, पळशी आणि भेंडेगाव, ता. लोहा, जि. नांदेड येथील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे नदीचे
अ


नांदेड, 27 सप्टेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण‌ मंत्री संजय राठोड यांनी नांदेड जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागांचा दौरा केला. शेवडी, पळशी आणि भेंडेगाव, ता. लोहा, जि. नांदेड येथील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे नदीचे पात्र तुडुंब भरून शेतात पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. तसेच, गावाकडे जाणारे रस्ते आणि पूल यांचेही गंभीर नुकसान झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून शेतकरी आणि ग्रामस्थांना मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांचे हित संरक्षित केले जाईल.

यावेळी आमदार आनंदराव तिडके,आमदार बालाजी कल्याणकर,आमदार बाबुराव कदम कोहळीकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, उपविभागीय अधिकारी रामेश्वर गोरे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, उपविभागीय कृषी अधिकारी अनिल श्रीफुले, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाधर बडोरे,विवेकजी देशमुख, विनय गिरडे शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शीतलताई भांगे स्थानिक शेतकरी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande