जळगाव, 27 सप्टेंबर (हिं.स.)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील पुरामुळे प्रभावित झालेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी व घरगुती कुटुंबीय अशा एकूण ३७ नागरिकांशी थेट संवाद साधला. याप्रसंगी भडगाव पाचोरा , जामनेर , तसेच अतिवृष्टी झालेल्या भागातील नागरिक ,शेतकरी ,व्यापारी आणि सामान्य नागरिकांनी आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडून उपस्थितांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे, तसेच आमदार सुरेश दामू भोळे, किशोर पाटील,मंगेश चव्हाण व मा. श्री. अमोल जावळे उपस्थित होते.जळगाव विमानतळावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल यांचीही उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर