नांदेड येथे सकल मातंग समाजाचे पुतळ्यासमोर बेमुदत धरणे आंदोलने
नांदेड, 27 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेड येथे सकल मातंग समाजाचे वतिने न्या. अनंत बदर समितीला देण्यांत आलेल्या अनावश्यक मुदतवाढ तत्काळ रदद करुन अनु. जाती आरक्षणाला आरक्षण जाहीर करावे आणि तोपर्यंत महाराष्ट्रातील नोकर भरतीस स्थगिती देण्यात यावी, या मागणी क
अ


नांदेड, 27 सप्टेंबर (हिं.स.)।

नांदेड येथे सकल मातंग समाजाचे वतिने न्या. अनंत बदर समितीला देण्यांत आलेल्या अनावश्यक मुदतवाढ तत्काळ रदद करुन अनु. जाती आरक्षणाला आरक्षण जाहीर करावे आणि तोपर्यंत महाराष्ट्रातील नोकर भरतीस स्थगिती देण्यात यावी, या मागणी करीता साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांचे पुतळयासमोर बेमुदत धरणे आंदोलने करण्यांत आले.

या आंदोलनास आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेट देवून उपमुख्यमंत्री ना.श्री अजितदादा पवार व शासन दरबारी या मागणी संदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांसह मातंग समाजातील मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande