छत्रपती संभाजीनगर, 27 सप्टेंबर (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पैठण-पाचोड रोडवरील दावालवाडी-नांदर फाटा येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गेल्या आठवड्यापासून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे विशेष म्हणजे पैठण तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांना मोठा धोका बसला असून शेती देखील वाहून गेली आहे
या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे ५० हजार रुपये हेक्टरी मदत तसेच इतर तातडीच्या मागण्या होत्या. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात मिळाली पाहिजे असा आंदोलकांचा सूर होता या आंदोलनामुळे वाहतूक देखील अनेक तास विस्कळीत आहेकाँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन शेतकरी बांधवांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला व त्यांच्या सोबत उभे राहिले
शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्यासाठी आम्ही सदैव सोबत आहोत. असे त्यांनी सांगितले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis