सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी
सोलापूर, 27 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून आज आणि उद्यासाठी दोन दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या या गंभीर इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील
सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी


सोलापूर, 27 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून आज आणि उद्यासाठी दोन दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या या गंभीर इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील दोन दिवस आपापल्या घरातच सुरक्षित राहावे आणि कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आता विविध भागांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून, त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील माढा, मोहोळ आणि करमाळा या तालुक्यांमध्ये अक्षरशः ढगफुटीसदृश पाऊस बरसत असल्याचे चित्र आहे. शहर परिसरात मात्र संतधार पाऊस सुरू आहे.

अतिवृष्टीमुळे माढा, मोहोळ आणि करमाळा या तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. सध्या ओढे, नदी आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपूर्वीच सीना नदीने रौद्र रूप धारण केले होते आणि नदी लगतची गावे पाण्याखाली गेली होती. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाकडून सीना नदीकाठच्या गावांना पुन्हा एकदा विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande