लातूर, 27 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातीलरेणा सहकारी साखर कारखाना 23 वी सर्वसाधारण सभा आज संपन्न झालीआज लातूर येथे रेणा सहकारी साखर कारखाना 23 व्या सर्वसाधारण सभेस कारखान्याचे संस्थापक सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख , माजी आमदार श्री धीरज विलासरावज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित सभा संपन्न झाली. स्व. विलासराव देशमुख व श्री दिलीपराव देशमुख दूरदृष्टी नेतृत्वामुळे जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांच्या आयुष्यात अमूलाग्र आर्थिक बदल झाला आहे.
या सर्वसाधारण सभेस वैजनाथ शिंदे, श्री त्र्यंबक भिसे, यशवंतराव पाटील, जगदीश बावणे, आबासाहेब पाटील, सर्जेराव मोरे, प्रमोद जाधव, उमाकांत खलंग्रे, श्याम भोसले, गणपतराव बाजूळगे, अशोक काळे, विजय देशमुख, सचिन पाटील, शेषेराव हाके,कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील,कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे,सर्व संचालक मंडळ आदी मान्यवरासह कारखान्याचे सर्व सभासद, शेतकरी बांधव,कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis