सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि भारतीय वायुदलात सामंजस्य करार
पुणे, 27 सप्टेंबर (हिं.स.): सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट पुणे, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि भारतीय वायुदल यांच्यात आज, शनिवारी सामंजस्य करार करण्यातआला. याप्रसंगी डॉ.विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका सिंबायोसिस व प्र-कुलगुरू
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि भारतीय वायुदलात सामंजस्य करार


पुणे, 27 सप्टेंबर (हिं.स.): सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट पुणे, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि भारतीय वायुदल यांच्यात आज, शनिवारी सामंजस्य करार करण्यातआला.

याप्रसंगी डॉ.विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका सिंबायोसिस व प्र-कुलगुरू ,सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ म्हणाल्या की, सिंबायोसिसच्या प्रमुख संस्थांपैकी एक असलेल्या एसआयबीएम पुणे ने राष्ट्रीय व आंतरराष्ट्र पातळीवर उच्च क्रमांक मिळवला आहे. आता भारतीय वायुदलाशी करारनाम्यावर स्वाक्षरी झाल्याने आम्हाला अभिमान वाटतोय. हा सहकार्य उपक्रम सिंबायोसिसच्या प्राध्यापक व वायुदलातील अधिकाऱ्यांसाठी एक समृद्ध शैक्षणिक अनुभव ठरेल. नेतृत्त्वाच्या भूमिकेत काम करणाऱ्या अनुभवी व्यवसायिकांना शिकवणे हे आव्हानात्मक असून तितकेच समाधानकारक देखील आहे. या भागीदारीच्या माध्यमातून हावाई दलाच्या विविध स्तरांसाठी अनेक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. हे अभ्यासक्रम वायुदलातील अधिकाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या करिअर संधी वाढवतील. तसेच पीएच.डी.साठी देखील संधी उपलब्ध करवून देतील. या सहकार्यातून अनेक नवनवीन संधी निर्माण होतील. तसेच हा प्रवास परस्परांना समृद्ध करणारा ठरेल अशा विश्वास येरवडेकरांनी व्यक्त केला.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande