नाशिक, 27 सप्टेंबर (हिं.स.)। ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करण्यात आला.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना पश्चिम भारताचे संघटक पोखरकर यांनी दहा-बारा तारखेला बंगलोर येथे होणाऱ्या सीबीटी बैठकीवर दबाव तंत्र वापरण्यासाठी पाच ते सहा हजार पेन्शनर व स्वतः कमांडर राऊत बेंगलोर येथे सत्याग्रह करणार आहेत, असे सांगितले. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष देवसिंग अण्णा यांनी सभेला मार्गदर्शन केले. त्यानंतर भविष्य निर्वाह निधीच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी मिनिमम पेन्शन आणि हायर पेन्शन या विषयावर चर्चा केली. तसेच हायर पेन्शनच्या सद्यस्थितीबद्दल माहिती घेतली. या प्रसंगी महाराष्ट्र ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती ईपीएस ९५ ऐक्सवर वेलफेअर असोसिएशन च्या वतीने प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले. उपसचिव हरिभाऊ व्यवहारे, जळगाव जिल्हाध्यक्ष अरविंद भारंबे, नाशिक जिल्हाध्यक्ष अरुण शेजवळ, जिल्हा सचिव विठ्ठलराव सोनवणे, ज्येष्ठ सल्लागार सुरेश जाधव, जिल्हा सदस्य पुंडलिक भामरे आदी उपस्थित होते. या मोर्चा आंदोलनासाठी अहिल्यानगर, जळगाव, धुळे जिल्ह्यातून ज्येष्ठांनी हजेरी लावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV