अमरावती, 27 सप्टेंबर (हिं.स.)तालुक्यातील भानामती नदीच्या काठावर वसलेल्या निसर्गरम्य मालखेड गावात ग्रामदैवत अंबामाता आणि शिवशंकर मंदिरात नवरात्रोत्सव भक्तीमय वातावरणात उत्साहाने सुरू आहे. यावर्षी नवरात्र महोत्सवाच्या अखंड ज्योत सप्ताहात तब्बल ७०० घटांची स्थापना करून हा धार्मिक सोहळा भव्यतेने साजरा होत आहे. सकाळ-सायंकाळ होणाऱ्या महाआरतीला शेकडो भाविक उपस्थित राहून दर्शन घेत आहेत.
पुराणकालीन संदर्भानुसार विदर्भ प्रदेशाचा राजा वृषभदेव याला दहा पुत्र होते. त्यापैकी एकाचा नाव केतुमाल होता. राजधानीच्या परिसरात मुलांना निवासस्थाने देण्यात आली होती. केतुमालाच्या नावावरून जी वस्ती निर्माण झाली, तिला सुरुवातीस 'मालकेतू' म्हणून ओळखले जाई. कालांतरानेयाच नावाचा अपभ्रंश होऊन 'मालखेड' हे नाव रूढ झाले.श्रीमद् भागवत व देवी भागवत ग्रंथातही मालकेतू वस्तीचा उल्लेख आढळतो. केतुमालाने भानामती नदीच्या काठावर अंबामातेची भक्तिभावाने आराधना केली.त्याच्या उपासनेने प्रसन्न होऊन अंबा माता प्रकट झाल्याची आख्यायिका आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, या हेतूने देवी येथेच स्वयंभू स्वरूपात विराजमान झाली, असे मानले जाते. त्यामुळे दरवर्षी ही परंपरा आवरत सुरू असून यावर्षी ७०० घटांची स्थापना करून सोहळ्याला नवी उंची मिळाली आहे. घटांची संख्या वर्षानुवर्षे वाढत चालली आहे. सकाळ-सायंकाळहोणाऱ्या महाआरतीदरम्यान भजन, कीर्तन, देवी स्तोत्र पठण यामुळे मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो.मालखेडवासीयांचे ग्रामदैवत म्हणून अंबादेवीची ओळख आजही आहे. सातारा जिल्ह्यात असणाऱ्या बऱ्याच खेड्या-गावाची मालखेडवासिनी अंबा माता कुलदैवत असल्याने वर्षभर तेथील भाविकांची रेलचेल मंदिरात पाहायला मिळते शिवाय या नवरात्र उत्सवात तेथील भाविकांचेदेखील घट आहेत.
नवरात्रोत्सवाची परंपरा
१९९७ साली अखंड ज्योत स्थापनेची परंपरा सुरूझाली. तेव्हापासून दरवर्षी ही परंपरा अविरत सुरू असून यावर्षी ७०० घटांची स्थापना करून सोहळ्याला नवी उंची मिळाली आहे. घटांची संख्या वर्षानुवर्षे वाढत चालली आहे. सकाळ-सायंकाळहोणाऱ्या महाआरतीदरम्यान भजन, कीर्तन, देवी स्तोत्र पठण यामुळे मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी