बोगस घुसखोरी व आरक्षणाच्या प्रश्नावर तीव्र निषेधअमरावती, 27 सप्टेंबर (हिं.स.) एकीकडे धनगर बंजारा समाज तीव्र आंदोलन करत अनुसूचित जमातीमध्ये समावेशाची मागणी करत असताना आता आदिवासी समाजाने अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का लावू नये, असे सरकारला सुनावले आहे. तिवसा तालुक्यातील क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आदिवासी विकास बहुद्देशीय संस्था तिवसा यांच्या नेतृत्वाखाली तिवसातहसीलवर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आदिवासी समाजाच्या नेत्यांनी धनगर आरक्षणावरून जागरूक होत आम्ही वाघाचे बछडे आहोत, आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही व शासन निर्णय २५ फेब्रुवारी २०२२ मध्ये अनुसूचित जामातीच्या बिंदू २ वरून ८ वर आल्याने आदिवासीवर मोठ्याप्रमाणात अन्याय झाला असल्याने बिंदु नियमावलीमध्ये दुरूस्ती करून परत बिंदू क्रमांक २ आणण्यात यावे, असा निर्णय सरकारने घ्यावा, आंदोलनाची तीव्रता वाढवून आमचा न्याय हक्क प्राप्त करू, आमच्या हिताचे निर्णय झाले पाहिजे आम्ही वाघाचे बछडे आहोत, असा इशारा क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आदिवासी विकास बहुद्देशीय संस्था तिवसा यांनी दिला. यावेळी तिवसातहसीलदार डॉ. मयूरकळसे यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील धनगर व बंजारा समाजाला आदिवासीमधील आरक्षण मिळावे म्हणून जोरदार आंदोलन व दबाव आणला जात आहे; मात्र खरा आदिवासी समाज आजही वंचित असून, आमच्या ताटातील अगोदर आम्हाला वाढाः मात्र आमध्या ताटातील काढून दुसऱ्यांना देत असाल, तर मुळीच सहन करणार नाही, अन्यथा राज्य नव्हे देशभर आंदोलन होईल, याची सरकारने नोंद घ्यावी, असा इशारा दिला आहे. यावेळी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आदिवासी विकास बहुद्देशीय संस्था तिवसा बिरसा ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी सुरेश उईके, अर्जुन युवनाते, यंच्छिन्द्र सयाम, मनिष धुर्वे, अरुण मडावी, सुरेश भलावी. सदाशिव उईके, महादेव धुर्वे, दिलीप सयाम, श्रीराम पंधरे, नरेश मडावी, मंगेश भोदळे, लक्ष्मण भलावी. यशवंत उईके, सुभाष धुर्वे, गजानन सिरसाम, कृष्णा कोकाटे, रामदास उईके यांच्यासह शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते. ------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी