चिपळूण : 'नमो युवा रन' मॅरेथॉनच्या टी-शर्टचे अनावरण
रत्नागिरी, 27 सप्टेंबर, (हिं. स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित ''नमो युवा रन'' मॅरेथॉन स्पर्धेच्या टी-शर्टचे आज दुपारी अनावरण करण्या
चिपळूण : 'नमो युवा रन' मॅरेथॉनच्या टी-शर्टचे अनावरण


रत्नागिरी, 27 सप्टेंबर, (हिं. स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित 'नमो युवा रन' मॅरेथॉन स्पर्धेच्या टी-शर्टचे आज दुपारी अनावरण करण्यात आले.

यावेळी भाजप नेते प्रशांत यादव, भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण, शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, माजी नगरसेवक विजयशेठ चितळे, भाजपच्या जिल्हा सरचिटणीस प्रणाली सावर्डेकर, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव विक्रम जैन, जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, क्रीडा सेल जिल्हाध्यक्ष दत्ताराम नार्वेकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष अनिल सावर्डेकर, गोरक्षक जिल्हाध्यक्ष अविनाश गुरव यांच्यासह शहर, ग्रामीण तसेच विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande