लातूर - स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान आणि सर्व रोग निदान कार्यक्रम संपन्न
लातूर, 27 सप्टेंबर, (हिं.स.) - सामान्य रुग्णालय, उदगीर येथे आज “स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान व सर्व रोग निदान कार्यक्रम” संपन्न झाला. या कार्यक्रमास माजी मंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे उपस्थित होते महिलांच्या आरोग्याची
अ


लातूर, 27 सप्टेंबर, (हिं.स.) - सामान्य रुग्णालय, उदगीर येथे आज “स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान व सर्व रोग निदान कार्यक्रम” संपन्न झाला.

या कार्यक्रमास माजी मंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे उपस्थित होते महिलांच्या आरोग्याची काळजी घेतल्यास संपूर्ण कुटुंब निरोगी राहते, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात महिलांसह नागरिकांची रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन तसेच विविध रोगांची तपासणी करण्यात आली. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून आवश्यक सल्ला व मार्गदर्शनही करण्यात आले.या अभियानामुळे महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होऊन कुटुंब सशक्त होईल, असे त्यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande