लातूर, 27 सप्टेंबर, (हिं.स.)। मराठवाड्यात सर्व जिल्ह्यात मे महिन्यापासून अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक घायमिटीला आला आहे. गेली काही दिवसापासून होत असलेली अतिवृष्टी ढगफुटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे ,उभ्या पिकांची नासाडी, शेती खरडून जाणे ,घरांची पडझड यामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे .या अस्मानी संकटाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इतर विकास कामाच्या ऐवजी तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळामुळे मिळणाऱ्या सर्व सवलती शेतकरी , शेतमजूर आणि सामान्य जनतेला देणे गरजेचे आहे . असे निवेदन शेतकरी कामगार पक्षा, लातूर जिल्ह्याच्यावतीने मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी देण्यात आले असून, या निवेदनामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे ,पशुधनाचे नुकसान भरून काढण्यासाठी पशुधन खरेदीसाठी आर्थिक मदत करावी ,मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबांस वीस लाख रुपये आर्थिक मदत करावी, शेतकऱ्यांचे सर्व वीज बिल माफ करावे ,शेतकरी संपूर्णतः कर्जमुक्त करावा, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संपूर्ण फीस माफ करावी, बँका व वित्तीय संस्थांची वसुली तात्काळ थांबवावी या प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या असून याची दखल शासनाने न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा शेतकरी कामगार पक्षाने दिला आहे.
लातूर जिल्हाधिकारी यांना भाई उदय गवारे, अँड सुशील सोमवंशी, अँड भालचंद्र कवठेकर, भाई अमर देशमुख , अँड जैनुद्दीन शेख, सोहम कवठेकर ,ओमप्रकाश आर्य, सतीश देशमुख, रत्नजीत जाधव, शिवाजी लोखंडे, वैजनाथ क्षीरसागर यांनी निवेदन दिले
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis