अलिबाग सरकारी कॉलनीत अनियंत्रित घडामोडी; पर्यावरण आणि सुरक्षा धोक्यात
रायगड, 27 सप्टेंबर (हिं.स.)। अलिबाग शहराजवळील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याने प्रफुल्लीत असलेली सरकारी कॉलनी आज बेकायदेशीर धंद्यांनी आणि कचर्‍याने भरलेली आहे. चार एकर क्षेत्रफळ असलेली ही वसाहत आता पूर्णपणे बकाल झाली असून, पडक्या इमारतींमध्ये दारू
Uncontrolled developments in Alibaug government colony; Environment and safety in danger


रायगड, 27 सप्टेंबर (हिं.स.)।

अलिबाग शहराजवळील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याने प्रफुल्लीत असलेली सरकारी कॉलनी आज बेकायदेशीर धंद्यांनी आणि कचर्‍याने भरलेली आहे. चार एकर क्षेत्रफळ असलेली ही वसाहत आता पूर्णपणे बकाल झाली असून, पडक्या इमारतींमध्ये दारू, जुगार, अश्लील उद्योग सुरु असल्याचे स्थानिकांनी तक्रार केली आहे. ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन या सगळ्यांपैकी कोणालाही या परिसराकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केला आहे.

सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता धायतडक आणि उपअभियंता विनायक तेलंगे यांच्याशी चर्चा केली. अधिकारी म्हणाले की, या कॉलनीसाठी शासनाकडे आधीच प्रस्ताव गेला असून कुंपण घालून संरक्षणासाठी निधी मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांनी तसेच म्हटले की, या जागेवर ६ ते ७ मजली इमारतींचा विकास झाला तर जिल्ह्यातील अनेक कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय होऊ शकते.

सध्या कॉलनीत प्रचंड कचरा टाकला जात असून, गुरे, कुत्रे मोकाट फिरत आहेत. जेष्ठ विधिज्ञ अँड. जे. टी. पाटील, डॉ. पाटणकर आणि अमित नारे यांनी चेंढरे ग्रामपंचायतीकडे कचर्‍याच्या तक्रारी केल्या आहेत. ग्रामपंचायतीचे प्रशासक साळावकर यांनी त्वरीत कचरा उचलण्यास आदेश दिला आहे.

स्थानिक लोकांचे सरकार आणि प्रशासनाकडे प्रश्न आहे की, “सरकारचे लक्ष कोठे आहे?” पर्यावरण आणि सामाजिक स्थिरतेसाठी ही गंभीर समस्या असल्याने जिल्हा प्रशासनाने या कॉलनीत लोकोपयोगी प्रकल्प किंवा नव्या कॉलनीची निर्मिती करावी अशी मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande