वैजापूर तालुक्यातील अचंलगाव येथे विकास कामांचे भूमिपूजन
छत्रपती संभाजीनगर, 27 सप्टेंबर (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातीलमौजे अचंलगाव येथे 7 कोटी 74 लाख रुपये निधी मंजूर करून आणलेल्या कामांचा भव्य भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला. मौजे अचंलगाव येथे मुख्यमंत्
अ


छत्रपती संभाजीनगर, 27 सप्टेंबर (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातीलमौजे अचंलगाव येथे 7 कोटी 74 लाख रुपये निधी मंजूर करून आणलेल्या कामांचा भव्य भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला.

मौजे अचंलगाव येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत विशेष पाठपुरावा करून राज्य महामार्ग 26 टुणकी ते अचंलगाव, बळ्हेगाव रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 7 कोटी 74 लाख रुपये निधी मंजूर करून आणला. त्या कामांचा भूमिपूजनाचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री.श्री.संजय शिरसाट यांच्या हस्ते व आमदार रमेश बोरणारे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडले.हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ वाहतूक मिळून आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासाची नवी दारे उघडली जातील.

या कार्यक्रमास माजी आमदार भाऊसाहेब पा चिकटगावकर उपनगराध्यक्ष साबेरभाई, सभापती रामहरी बापू जाधव, माजी सभापती संजय पा निकम, भागिनाथ मगर, माजी महापौर विकास जैन, प्रदीप पटवर्धन, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पा साळुंके, शहरप्रमुखपारस घाटे, युवासेना जिल्हाप्रमुख भरत कदम, यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande