परभणी : गोदावरी नदीवरील धानोरा काळे पुलावर पाणी; वाहतूक बंद
परभणी, 27 सप्टेंबर (हिं.स.)। धानोरा काळे परिसरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलावर पाणी आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने वाहतुकीसाठी रस्ता बंद केला आहे. सततच्या पावसामुळे नदीला पूर आल्याने पाणी पुलावरून वाहू लागले आहे. दरम्यान, नागरिकांनी अ
गोदावरी नदीवरील धानोरा काळे पुलावर पाणी, वाहतूक बंद


परभणी, 27 सप्टेंबर (हिं.स.)। धानोरा काळे परिसरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलावर पाणी आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने वाहतुकीसाठी रस्ता बंद केला आहे. सततच्या पावसामुळे नदीला पूर आल्याने पाणी पुलावरून वाहू लागले आहे.

दरम्यान, नागरिकांनी अनावश्यकपणे पुलावरून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये, अशी सूचना प्रशासनाने केली आहे. नदीचा पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande