भगवान गडावरील दसरा मेळाव्यासाठी पिंपरीतून हजारो नागरिक जाणार - सदाशिव खाडे
पुणे, 27 सप्टेंबर (हिं.स.)। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भगवान गडावर दसरा मेळावा साजरा करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातून गतवर्षी प्रमाणे या वर्षी देखील हजारो नागरिक जाणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्
भगवान गडावरील दसरा मेळाव्यासाठी पिंपरीतून हजारो नागरिक जाणार - सदाशिव खाडे


पुणे, 27 सप्टेंबर (हिं.स.)।

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भगवान गडावर दसरा मेळावा साजरा करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातून गतवर्षी प्रमाणे या वर्षी देखील हजारो नागरिक जाणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी दिली. चिंचवड येथे श्री भगवान गडावर जाणाऱ्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, रघुनंदन घुले, माजी स्वीकृत सदस्य ॲड. मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.

या नंतर माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सदाशिव खाडे यांनी सांगितले की, सावरगाव, तालुका पाटोदा, जिल्हा बीड येथील श्री संत भगवान बाबा यांचे गडावरील स्थळ हे बहुजन समाजाचे श्रद्धास्थान आहे. या गडावर दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी लाखोंच्या संख्येने बहुजन समाजातील बंधू, भगिनी तसेच वारकरी व धार्मिक, सांप्रदायिक क्षेत्रातील भाविक उपस्थित राहत असतात. यावर्षी पिंपरी चिंचवड शहरातून देखील पाच हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समन्वयक सदाशिव खाडे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande