पुणे, 27 सप्टेंबर (हिं.स.)।
२७व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात ५००हून अधिक महिलांनी शिवदर्शन-सहकारनगर येथील श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात सामूहिक श्रीसूक्त पठणाचे पाच वेळा आणि श्री विष्णू सहस्रनामाचे पाच वेळा आवर्तन केले. प्रारंभी सर्व महिलांनी श्री लक्ष्मीमातेची सामूहिक आरती केली. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल सहभागी झाले होते. सर्व सहभागी महिलांना प्रसाद व भेटवस्तू देण्यात आल्या. याप्रसंगी सोनम बागुल व श्रुतिका बागुल उपस्थित होते. हा उपक्रम गेली २७ वर्षे चालू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु