डहाणूत सरपंच रुपजी कोल यांच्या पुढाकाराने कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
पालघर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। डहाणू तालुक्यातील आगवन ग्रामपंचायतीचे सरपंच रुपजी कोल यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. जयघोष व जल्लोषाच्या वातावरणात झालेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनेला
डहाणूत सरपंच रुपजी कोल यांच्या पुढाकाराने कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश


पालघर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

डहाणू तालुक्यातील आगवन ग्रामपंचायतीचे सरपंच रुपजी कोल यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. जयघोष व जल्लोषाच्या वातावरणात झालेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनेला नवी ऊर्जा मिळाली.

सरपंच रुपजी कोल यांनी दि. १६ मे २०२५ रोजी स्वतः पक्षप्रवेश करून आपली बांधिलकी दाखवली होती. आज त्यांच्या पुढाकारातून कार्यकर्त्यांनी औपचारिक प्रवेश केला. यावेळी बोलताना कोल म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे जनहितकारी कार्य हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. गावोगावी विकास राबवून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”

तसेच आमदार विलास तरे, आमदार राजेंद्र गावित, जिल्हा प्रमुख कुंदन संखे व वसंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने संघटन अधिक बळकट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रवेश सोहळ्यास स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे डहाणू तालुक्यातील शिवसेना आणखी मजबूत होईल, असा विश्वास ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande