नाशिक - सर्वच नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
नाशिक , 28 सप्टेंबर (हिं.स.)। - नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाने चांगलीच दानाफान उडवली असून जिल्ह्यामध्ये पावसाने 1हजार मिलिमीटर पेक्षा जास्त ची नोंद केली आहे तर मागील बारा तासांमध्ये 62 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे यामुळे जिल्ह्यात अनेक नद्यांनी धो
नाशिक - सर्वच नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी


नाशिक , 28 सप्टेंबर (हिं.स.)।

- नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाने चांगलीच दानाफान उडवली असून जिल्ह्यामध्ये पावसाने 1हजार मिलिमीटर पेक्षा जास्त ची नोंद केली आहे तर मागील बारा तासांमध्ये 62 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे यामुळे जिल्ह्यात अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे तर गोदावरी नदीला पुन्हा पूर आलेला आहे.

नाशिक शहर आणि जिल्हा परिसरामध्ये शनिवारी बदललेल्या हस्त नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये चांगली दाणाफान उडालेली आहे. शनिवारी सायंकाळी आठ वाजेपासून सुरू झालेला पावसामुळे जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 62 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली होती 12 तासांमध्ये झालेली ही नोंद एक रेकॉर्ड मानले जात आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत म्हणजेच एक जून पासून ते 28 सप्टेंबर पर्यंत पावसाने 1005 मिली मिटर पडण्याचा विक्रम देखील नोंदविलेला आहे. यापैकी रात्री 02:30 पासून ते पहाटे पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत 14.2 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आलेला आहे.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आलेला आहे. गंगापूर धरणातून 12 हजार क्युसेस पाणी हे नदीपात्रात सोडण्यात आलेले आहे . पाटबंधारे विभागाच्या वतीने सकाळी सहा वाजता घरी पत्रात सोडण्यात आलेल्या पाण्याची देण्यात आलेल्या माहितीनुसार दारणा 12167,वालदेवी 814,आळंदी 243, होळकर पुलाखालून 8150,भावली - 290,भाम - 510,वाघाड - 930,पालखेड 12124,नांदूर मधमेश्वर 31283,करंजवण -6575,कडवा-6752,तिसगाव-78,गौतमी गोदावरी -1296,काश्यपी -480,ओझरखेड-700,पुणे गाव - 1920,मुकणे - 760,वाकी - 444 क्युसेस पाणी हे नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेले आहे यामुळे सर्वच नद्या या धोक्याच्या पातळीच्या पुढे वाहत आहे.

दरम्यान दुसरीकडे सतत सुरू असलेल्या पावसामुळे महामार्गावरचे देखील वाहतुकीची मोठी कोंडी झाली असून नाशिक मुंबई महामार्गावरती शहापूर ते नाशिक पर्यंत मोठी वाहतूक जाम झालेली आहे यामध्येच जिंदाल कंपनीजवळ अपघात झाल्यामुळे अजूनच भर पडलेली आहे तर नाशिक पुणे महामार्गावर ती देखील अनेक भागातून पाणी महामार्गावरती आले आहेत त्यामुळे हा महामार्ग देखील धिम्या गतीने सुरू आहे तसेच नासिक संभाजीनगर, नाशिक सुरत या महामार्गांवरती देखील पावसामुळे वाहतूक मंदावली आहे. तर शहरामध्ये जणू पावसाने संचार पंडित लावली आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे शहरातील रस्ते हे जलमय झालेले असले तरी देखील दुसरीकडे मात्र हे रस्त्याने मनष्य दिसून येत आहे एक दोन नागरिकांच्या व्यतिरिक्त आणि तुरळक वाहतुकीच्या शिवाय रस्त्यांवर फारशी गर्दी दिसत नाहीये.

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande