छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद रत्नपुर तालुक्यातील गोळेगाव येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची आज माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पाहणी केली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ऐकून घेतल्या.
मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे परिसरातील घरांत पाणी शिरले आहे. शेती खरडून गेली असून संपूर्ण शेतीमाल नष्ट झाला आहे. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख राजू वरकड, गणेश अधाने, विजय चव्हाण व गोकुळ गवळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis