अंबादास दानवेंची रेस्क्यू टीमसोबत बचाव मोहीम, वयोवृद्धाची पुराच्या पाण्यातून सुटका
छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील हडसपिंपळगाव येथील वयोवृद्ध गणपत त्र्यंबक निघोटे पुराच्या पाण्यात शेतमाळ्यात अडकले होते. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रेस्क्यू टीम सोबत जात बचाव मोहीम राबव
अ


छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील हडसपिंपळगाव येथील वयोवृद्ध गणपत त्र्यंबक निघोटे पुराच्या पाण्यात शेतमाळ्यात अडकले होते. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रेस्क्यू टीम सोबत जात बचाव मोहीम राबवली आणि या वृद्धाची रेस्क्यू टीमसह सुटका केली.

यावेळी बोलताना दानवे म्हणाले की,या अस्मानी संकटामूळे शेतकरीचा हातातील घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे.

सरकार फक्त कोरडे आश्वासन देऊन शेतकऱ्यांचे थट्टा उडवत आहे, पैसे नसल्याचे सौंग करतेय, यांना निवडणुकीत लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली निवडणूकीत पैसे आहे, पण ईथे नाही. राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५०,००० रुपये नुकसानभरपाई द्यावी तसेच कर्जमाफी करावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande