अमरावती शहरात संघाचे 8 नगरात पथसंचलन
अमरावती, 28 सप्टेंबर (हिं.स.) | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाल्याने शताब्दी उत्सवाचे औचित्य साधून रा. स्व. संघ अमरावती महानगर अंतर्गत येणाऱ्या आठ नगरांतील स्वयंसेवकांचे वेगवेगळ्या आठ स्थानांवरून शनिवार २७ सप्टेंबरला पथसंचलन करण्यात आल
शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधत.... रा. स्व. संघाचे शहरातील 8 नगरात पथसंचलन


अमरावती, 28 सप्टेंबर (हिं.स.) | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाल्याने शताब्दी उत्सवाचे औचित्य साधून रा. स्व. संघ अमरावती महानगर अंतर्गत येणाऱ्या आठ नगरांतील स्वयंसेवकांचे वेगवेगळ्या आठ स्थानांवरून शनिवार २७ सप्टेंबरला पथसंचलन करण्यात आले. इंद्रायणी नगराचे पथसंचलन शनिवारी सांयकाळी ५ वाजता गोंड बाबा मंदिराच्या मागील मैदानावरून निघाले. पद्माकर महाराज यांच्या घरासमोरून विठ्ठल मंदिर, दस्तूर नगर गोरक्षण समोरून गोंड बाबा मंदिर प्रांगणात समारोप झाला.

अंबिका नगराचे पथसंचलन सायंकाळी ५ वाजता हिदवीर क्रीडा मंडळ मैदान, जोगळेकर प्लॉट येथून सुरु झाले.गांधीनगर ते सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र रोड ते पोरवाल पेंट हाऊस रोड ते कदम कोचिंग क्लासेस, शाम नगर ते कस्तुरबा इंग्लिश स्कूल ते सावदेकर हॉस्पिटलमार्ग ते वर्धासा आप्पा किराणा दुकान ते हिदवीर क्रीडा मंडळ मैदानात पथसंचलनाचा समारोप झाला.

तपोवन नगराचे पथसंचलन सांयकाळी ५ वाजता स्व. हरिभाऊ कलोती उद्यान चांदूर रेल्वे रोड, अमरावती येथून करण्यात आले. वडाळी नाका, इंद्रशेष बाबा मंदिर, अण्णाभाऊ साठे चौक, बांबू गार्डन रस्ता, तुळजा भवानी मंदिर येथून उद्यानाच्या मैदानावर समारोप झाला. बालाजी नगराचे पथसंचलनाचा शनिवारला सकाळी स्वामी समर्थ मंदिर, जनार्दन पेठ येथून शुभारंभ झाला. भूतेश्वर चौक, प्रभात कॉलनी, गणेश कॉलनी, दसरा मैदान रोड, पन्नालाल नगर, बालाजी प्लॉट संघ कार्यालय, चुनाभट्टी मार्गे जनार्दन पेठ येथे समारोप करण्यात आला. गाडगे नगराचे पथसंचलन सांयकाळी ५ वाजता पसौरभ कॉलनी हनुमान मंदिर आशियाड चौक येथून सुरु झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा शेगाव, सोनल कॉलनी, अयोध्या कॉलनी, गुरुकुंज कॉलनी मार्गे येऊन पसौरभ कॉलनीत समारोप झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande