आपत्तीग्रस्तांसाठी संजयदादा गरुड यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना निधी सुपूर्द
जळगाव , 28 सप्टेंबर (हिं.स.) राज्यात अलीकडील अतिवृष्टी व पूरस्थिती या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी समाजातील विविध घटक
आपत्तीग्रस्तांसाठी संजयदादा गरुड यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना निधी सुपूर्द


जळगाव , 28 सप्टेंबर (हिं.स.) राज्यात अलीकडील अतिवृष्टी व पूरस्थिती या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी समाजातील विविध घटकांना पुढे येऊन पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्याचे भावनिक आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, व माजी जि.प. सदस्य संजयदादा गरुड यांनी आज धुळे दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जळगाव विमानतळावर प्रत्यक्ष भेटून व्यक्तिशः व विविध संस्थांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रू.७१०६६६/- ची आर्थिक मदत धनादेशाद्वारे सुपूर्द केली. याप्रसंगी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आदी उपस्थित होते. शेंदुर्णीतील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑफ सोसायटी ली. शेंदुर्णी, आचार्य गजाननराव गरुड पतसंस्था शेंदुर्णी, शेंदुर्णी सहकारी फळ विक्री संस्था मर्या.शेंदुर्णी, श्री त्रिविक्रम महिला सहकारी दूध उत्पादक संस्था मर्या.शेंदुर्णी व व्यक्तिशः संजयदादा गरुड व मा.जि.प.सदस्या सौ.सरोजिनी संजयराव गरुड यांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून अल्पशा मदतीचा हातभार लावून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. पूरग्रस्तांना तातडीने दिलासा मिळावा, शासनाकडून मदतकार्य गतीमान व्हावे यासाठी संजयदादा गरुड यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे विशेष मागणी केली. पूरस्थितीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून पिकांचे पंचनामे त्वरित करून मदतीचे वितरण लवकरात लवकर व्हावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande